गावाविषयी माहिती

बोटोशी,
बोटोशी हे गाव देवबांध पिंजाळ नदीच्या तिरावर वसलेले आहे बोटोशी गावाला वळसा देऊन जानारी पिंजाळ नदी गावाच्या पुर्वेला गावा देवीच मंदीरा जवळ मोठे वेहळ्याचे झाड आहे.आंब्याचे झाड आहे गावाच्या मध्ये भागी मारुतीचे मंदिर आहेगावाच्या चारी बाजुन नदी आणि डोंगर आहेत डोंगरावर मोठी झाडी आहे गावाच्या पश्चिम दिशेला मर्कटवाडी हा एक पाडा आहे हा पाडा डोंगरावर असुन तिथुन पिंजाळ नदी कुर्लोद कडे जाते. बोटोशीच्या पुर्वेला बेलपाडा आहे बेलपाडा येथे शाळा आहे इ १ ली ते ५ वी पर्यत शाळा आहे गावात आंब्याची झाडे आहेत चिंचेची झाडे आहेत बेलपाड्याच्या उत्तरेला भोसपाडा आहे हे एकदम डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. गावाच्या पश्चिमेला घातोडीचा ओहळ आहे पुर्वेला व दक्षिणेला मोठे डोंगर आणि झाडी आहे.

पाथर्डी,
पाथर्डी गाव हे गोमघर आंब्याची विहिर डोंगरवाडी कडुन येणारा मोठा ओहळ आहे आणि त्या ओहळाच्या तिरावर पाथर्डी हे छोटेशे गाव वसलेले आहे. मोखाडा तालुका आणि पालघर जिल्यातील असुन पाथर्डी गाव हे मुळ गावठण असुन त्यांना जोडुन चार पाडे आहेत. डोंगरवाडी,धिंडेवाडी, रामवाडी पाटीलपाडा  हे चार पाडे आहेत पाथर्डी गावठाणच्या पुर्वेला एक मोठा ओहळ आहे. गावाच्या उत्तर दिशेला गावदेवी मंदिर आहे गावाच्या पच्छिम दिशेला डोंगर आहेत  व दक्षिण दिशेला मोठे डोंगर आहेत पाथर्डी गाव पैकी धिंडेवाडी मध्ये बहिरोबाचे मंदिर आहे मंदिरा जवळ मोठी झाडे आहेत वेहळ,आंबा,सफेद चाफा आशी झाडे आहेत आमच्या पाथर्डी गाव पैकी रामवाडी हि ओहळाच्या तिरावर वसलेली आहे तिथे गावाच्या पुर्वेला ओहळ आहे पच्छिमेला मोठे डोंगर व मोठी झाडी आहे गावाच्या उत्तर दिशेला पाटीलपाडा वसलेला आहे  पाटीलपाडा हा पाडा देवबांध पिंजाळ नदीच्या तिरावर वसलेले आहे गावात गावात मोठी चिंचेची झाडे आहेत आंब्याचा झाड आहे आणि प्रत्येक पाड्या मध्ये जि.प.शाळा आहे. त्यात पाटीलपाडा येथे केंद्र शाळा इयत्ता १ली ते ८वी पर्यत आहे.

भौगोलिक स्थान

बोटोशी आणि पाथरडी ही महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील (पूर्वीचा ठाणे) मोखाडा तालुक्यात असलेली गावे आहेत, जी सह्याद्री पर्वतरांगेजवळील डोंगराळ भूभागासाठी ओळखली जातात. ही गावे लक्षणीय आदिवासी लोकसंख्या आणि नयनरम्य निसर्गरम्य दृश्यांच्या प्रदेशात वसलेली आहेत.

बोटोशी आणि पाथरडी ही गावे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या (पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग) मोखाडा तालुक्यात (तहसील) स्थित आहेत. या ठिकाणांची भौगोलिक माहिती खालीलप्रमाणे आहे:

बोटोशी गाव:
मोखाडा सामुदायिक विकास गटामध्ये स्थित, हे गाव अंदाजे १,३३२ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. जिल्ह्याच्या प्रशासकीय रचनेत त्याची ओळख पाथरडी क्लस्टरचा भाग म्हणून केली जाते.

पाथरडी गाव:
मोखाडाच्या वनमय, डोंगराळ दरीच्या प्रदेशात वसलेले, हे गाव अंदाजे ७.९१ चौरस किलोमीटर (७९१ हेक्टर) भौगोलिक क्षेत्र व्यापते.

सामान्य निर्देशांक:
मोखाडाचे मुख्यालय अंदाजे १९°५६′ उत्तर ७३°२०′ पूर्व या ठिकाणी आहे.

भूप्रदेश आणि उंची:
हा प्रदेश उंच, वनमय डोंगराळ दऱ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे, आणि मोखाडा मुख्यालय समुद्रसपाटीपासून अंदाजे १,६०० फूट उंचीवर आहे.

जवळपासचा परिसर:
या भागाच्या पूर्वेला नाशिक जिल्ह्याचा त्र्यंबकेश्वर तालुका आहे. पाथरडीच्या सर्वात जवळचे मोठे शहर जव्हार आहे, जे सुमारे ५८ किलोमीटर अंतरावर आहे.

बोटोशी-पाथर्डी हे गाव मोखाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २२ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ 1776.17 हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण 718 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या 2221 आहे. त्यामध्ये 1223 पुरुष व 998 महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगर-दरीने व्यापलेल्या प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन खूप कमी क्षेत्रात आहे. तसेच गावालगत अवघ्या देवबांध ची नदी असून ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो.

येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

महाराष्ट्रातील मोखाडा तालुक्यात असलेले बोटोशी, पाथर्डी आणि मोखाडा या सर्व ठिकाणी सारखेच उष्णकटिबंधीय हवामान असून, येथे एक विशिष्ट पावसाळा आणि एक उष्ण, कोरडा उन्हाळा असतो. या प्रदेशात वर्षभर तापमान उष्ण असते, आणि मान्सूनच्या महिन्यांत लक्षणीय पाऊस पडतो.

वार्षिक हवामानाचा आढावा:

उन्हाळा (मार्च - मे):
हा वर्षातील सर्वात उष्ण काळ असतो, ज्यात सरासरी दैनंदिन कमाल तापमान अनेकदा ३७°C (९८°F) पेक्षा जास्त असते आणि मे महिन्यात ते ३८°C (१०१°F) पर्यंत पोहोचू शकते.

पावसाळा (जून - सप्टेंबर):
या काळात मुसळधार आणि दमट पाऊस पडतो आणि आकाश ढगाळ असते. सरासरी दैनंदिन कमाल तापमान थोडे कमी होते, परंतु आर्द्रता खूप जास्त असते.

थंडीचा हंगाम (नोव्हेंबर - फेब्रुवारी):
हा काळ अजूनही उष्ण असला तरी, वर्षातील सर्वात थंड काळ आहे. सरासरी दैनंदिन कमाल तापमान ३१°C (८७°F) पेक्षा कमी असते, आणि रात्रीचे तापमान सुमारे १८°C (६४°F) च्या आसपास आरामदायक असते.

बोटोशी-पाथर्डी गाव आंबा व काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यास जलसंधारणाची चांगली सोय होईल.

लोकजीवन

बोटोशी -पाथर्डी .गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात, नाचणी  व हंगामी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक फुलाच्या वाड्या, आंब्याच्या वाड्या, यामध्येही कार्यरत आहेत. गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे. येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बोटोशी -पाथर्डी. च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

घटक संख्या
पुरुष १२१३
स्त्री ९९८
एकूण लोकसंख्या २२२१

संस्कृती व परंपरा

बोटोशी -पाथर्डी .गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात गाव देवी,बहिरोबा  यात्रा हि चैत्र मध्ये मोठ्या उत्साहात 2 दिवस भरवली जाते त्यात प्रामुख्याने गाव देवी,बहिरोबा  मिरवणूक हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात. गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

बोटोशी -पाथर्डी .गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत पुर्वमुखी मारुती मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

विठ्ठल रुख्मिणी मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन काळातील मंदिर आहे.

शेती क्षेत्र भात  – बोटोशी-पाथर्डी येथे  भात, नाचणी, उडीद  उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

जवळची गावे

बोटोशी गाव तसेच पाथर्डी गाव मोखाडा तालुक्यातील पूर्वेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

पाथर्डी, डोंगरवाडी, पाटीलपाडा, धिंडेवाडी, रामवाडी, भोसपाड, बेलपाड, बोटोशी,  मर्कटवाडी यासारखी गावे आसपासची प्रमुख गावे आहेत.